कुलदैवत टाक व त्यांचे महत्व
कुलदैवत किंवा कुलदेवता, कुलस्वामी किंवा कुलस्वामिनी म्हणजे ज्या विशिष्ट देवाची व देवीची उपासना ज्या घराण्यातील लोक परंपरेने करतात, त्यांचा तो कुलपरिपाठ असतो, तो विशिष्ट देव व देवता त्या घराण्याचे कुलदैवत व कुलस्वामिनी असते. प्रत्येक गावाचे विशिष्ट ग्रामदैवत किंवा ग्रामदेवता असते, तसे प्रत्येक घराण्याचेही विशिष्ट कुलदैवत किंवा कुलदेवता असते. त्या घरातील प्रत्येक शुभमंगल प्रसंगी कुलदेवतेचे पूजन करतात आणि ठराविक दिवशी त्या कुलदैवताला महानैवेद्य समर्पण करण्याची प्रथा असते. त्यालाच कुळधर्म म्हणतात.
आपल्या हिंदू धर्मात कुठल्याही शुभकार्याची सुरवात करतांना प्रथम विघ्नहर्ता गणेशाचे पुजन करण्याची प्रथा आहे. त्यानंतर आपल्या कुलदैवताचे स्मरण करुन त्यांची शोडषोपचारे पूजा करुन आपल्या मनातील इच्छा त्यांच्या समोर प्रगट करतो.
कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे जो रक्षण करतो ते दैवत किंवा ती कुलदेवता. या कुलदैवतांची परंपरागत माहिती आपल्या पर्यंत पूर्वजांपासून पोहोचलेली आहे व इथून पुढेही ही माहिती अशीच चालत राहणार आहे. आता कुलदैवताचा अर्थ त्याची मुळ उत्पत्ती कशी झाली? केव्हा झाली ? हा प्रश्न आपल्या चौकस बुद्धीला वाटणे साहजिकच आहे. आपण आपल्या कुळगोत्राकडे जर बारकाईने नजर टाकली तर आपले मुळ पुरुष हे ऋषीमुनी असावेत. त्यांच्याच नावावरून आपणास आपले कुळ गोत्र समजते. उदा. कौंडीण्य, जमदग्नी, वशिष्ठ, माकैडेय, भारद्वाज, अगस्ती, पौलस्ती, विभांडीक, पाराशर, कश्यप इत्यादी इत्यादी. या ऋषींचे वास्तव्य वनांमध्ये आपापल्या आश्रमात असायचे.
ते जरी पंचमहाभूतांना ईश्वर मानीत असले तरी कुठल्याही दैवताला अदृष्यशक्ती मानून त्यांची उपासना करीत. तेच दैवत कालांतराने त्या कुळाचे कुलदैवत मानले असावे. हे कुलदैवत किंवा कुलदेवता सगुण रुपात आपल्या दृष्टीसमोर असाव्यात म्हणून पंचकोनी पाषाणामध्ये त्या मुर्ती कोरून त्याची पुजा अर्चा करीत असत. पुढे याच पाषाणातून रेखीव मुर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदीरात होऊ लागली. देवघरात मात्र धातूच्या मुर्ती आकारास आल्या.
त्याच बरोबर कुलदैवतांच्या टाकांची निर्मिती होऊ लागली. त्यांचे आकारही असेच पंचकोनी परंतु प्रत्येकांच्या रितीरिवाजाप्रमाणे लहान मोठे देवघरात विराजमान झालेत. प्रत्येक कुळाचे कुलदैवत किंवा कुलदेवता भिन्न भिन्न आहेत. मल्हारी मार्तंड खंडोबा किंवा भैरोबा हे चार्तुवण्यांचे कुलदैवत मानतात. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, आदी सर्व वर्गातील समाजामध्ये खंडोबा हे कुलदैवत बघावयास मिळते.
बहिरोबा किंवा भैरवनाथ हे सुद्धा शंकराचे अवतार मानले जातात. त्यांची अनेक नांवे प्रचलित आहेत. जशी भैरोबा, भैरुदेव भैरीभवानी. यात भैरी म्हणजे शिवशंकर व भवानी म्हणजे तुळजापूरची भवानी. यात कुलदैवत व कुलस्वामिनी यांचा संयोग होतो. या व्यतिरिक्त ग्रामदेवता, रक्षक, पुर्वज (मुळ पुरुष) यांचे काही परीवारामध्ये टाक असतात.
कुलदेव, कुलदेवी, भैरवनाथ (देवांचा रक्षक), ग्रामदैवत, रक्षक/वीर हे पाच टाक तुमच्या देवघरात असणं आवश्यक आहे.
कुलदेवता किंवा कुलस्वामिनी यांचा विचार केला तर त्यांची मुळ रूपे ही शिवपत्नी पार्वतीदेवी व विष्णूपत्नी महालक्ष्मी या आदी शक्तींनी वेळोवेळी मानवाच्या कल्याणासाठी अधर्म व दुष्ट शक्तींचा विनाश करण्यासाठी अनेक रुपे घेतलेली आहेत. हे आपल्याला दुर्गासप्तशती, श्री सुक्त इत्यादी पुराण ग्रंथामधून समजते. आदीशक्ती देवीची जी साडेतीन शक्ती पीठे आहेत म्हणजेच कोल्हापूर निवासिनी, तुळजाभवानी, माहूरगडची रेणुकामाता व सप्तश्रृंग गडावरील सप्तश्रृंगी.
या कुलदेवता व्यतिरिक्त, म्हाळसाई, आंबेजोगाई, विंध्यवासिनी, एकवीरा, आशापूरी, नागाई, मनुदेवी, धनाई पुनाई अशा विविध रुपात या कुलदेवतांचे टाक घरोघरी दिसतात. अशा या कुलदैवताच्या टाकांची निर्मिती पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार चांदी व तांबे यापासून होत आहे. चांदी हा धातू सात्विक आणि पवित्र मानला जातो. चांदीमध्ये शितलता असते व तांब्यामध्ये उष्णता. या दोघांच्या एकत्रीकरणाने शितलता व उष्णता याचा समतोल राखण्यासाठी टाकांसाठी चांदी व तांबे याचा सर्रास उपयोग केला जातो.
Click Here To Buy Kuladaivat Tak
कुलदैवतांच्या टाकांवरील मूर्तीसाठी चांदीचा पत्रा वापरतात. व त्यास पाठीमागे तांब्याच्या पत्र्याचा आधार दिला जातो. या दोन पत्र्यामध्ये पोकळी निर्माण होते व टाक पुजेच्या वेळी दवण्याचा संभव असतो म्हणून या पोकळीत लाख भरतात त्यामुळे टाक टणक बनतात. पुजनाच्या वेळी त्यात पाणी जाण्याची शक्यता नसते. ही परंपरागत टाक तयार करण्याची पद्धत आजही चालू आहे. ह्या मुळे आपल्या कुलदेवतांच्या टाकांची झीज होत नाही व ते पिढ्यान पिढ्या वापरले जातील.
1) टाक म्हणजे काय?
टाक म्हणजे आपल्या कुलदेवतांच्या प्रतिमा.
2) तुमचं कुलदैवत आणि कुलधर्म म्हणजे काय?
आपल्या कुळांचे देव म्हणजे कुलदैवत आणि त्यांची पूजा अर्चा करणे म्हणजे कुलधर्म.
3) तुम्हाला तुमचे कुलदैवत (म्हणजेच कुलदेव आणि कुलदेवी ) माहित आहे का ? दरवर्षी तुम्ही तुमच्या कुलदेवी आणि कुलदैवताच्या दर्शनाला जाता का?
देवांची जर माहिती नसेल तर आपल्या वंशामध्ये कुठल्या देवीची पूजा केली जाते हे माहित करून घ्यावे.
4) तुमच्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदैवताचे टाक म्हणजे एक चांदीची प्रतिमा त्यांच्या नावाने तुमच्या घरात असणं आवश्यक आहे, हे तुम्हाला माहिती आहे का
आपण आपल्या देवघरामध्ये सर्व देवांची पूजा करतो, त्यांच्या मूर्ती अथवा फोटो ठेवतो. परंतु आपण कुलदैवत टाळतो. पण कुलदेवतांची पूजा करणे अतिशय महत्वाचे आहे. हा एक कुलधर्म – कुळाचारच आहे. आपल्या घरात असलेल्या सर्व जणांवर आपल्या कुलदेवतेची कृपादृष्टी राहावी हि यामागची भावना आहे.
5) तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाचं अथवा मुलीचं लग्न होऊ घातलेलं असेल तर तुमच्या घरातले देव नव्याने करणं आवश्यक असतं , हे तुम्हाला माहिती आहे का?
जेव्हा घरामध्ये शुभकार्य असते तेव्हा देव (टाक) नव्याने घडवणे आवश्यक असतं. त्यासोबतच खालील काही गोष्टींमध्ये लक्ष देणे आवश्यक असते. जसे कि:
1) माशी लागणे म्हणजेच देव भंगणे,
2) नाक आणि डोळे झिजणे,
3) झिजलेल्या भागातून लाख बाहेर येणे,
4) निरीक्षण करून पाहावे कि देव खंडित जाले आहेत का
अश्या वेळी टाक नव्याने बनवणे आवश्यक असते.
6) कुलदेवतेचे टाक कोणत्या प्रकारचे असतात?
अ) पारंपारिक टाक :- परंपरेनुसार टाक हे पंचकोनी असतात. आपल्या देवतांच्या टाकांच्या प्रतिमेचा पुढील भाग हा चांदीचा असून मागील भाग हा तांब्याचा असतो. पुढील चांदीच्या टाकाचा पत्रा पातळ असल्या कारणामुळे तो दबला जावू नये म्हणून त्यामध्ये लाख भरली जाते. हे टाक कमीतकमी वजनामध्ये पण बनतात.
ब) चांदीचे भरीव टाक :- आधुनिकतेमुळे टाकांच्यामध्ये लाख न भरता ते पुर्णतः चांदीतच बनविले जातात. त्यामुळे ते खराब होण्याची भिती नसते व ते वर्षानुवर्षे टिकतात.
क) चांदीचे भरीव टाक स्टँडसहीत :- चांदीच्या भरीव टाकांना स्टँडचा आधार दिल्याने आपण देवघरात त्यांची पुजा करून ठेवल्यानंतर ते एकसारखे दिसतात व स्टँडमुळे ते पडत ही नाही.
ड) हाताने घडविलेले मोठे टाक :- काही परिवारांमध्ये मोठ्या आकाराच्या टाकांची परंपरा असते. हे टाक हाताने कलाकुसर करून घडविले जातात. यामुळे ते अत्यंत रेखीव व उठावदार असल्याने सुंदरही दिसतात. त्यांचे आकारमान कमीत कमी ४.५ x ३.५ इंच इतके असतात.
7) कोणकोणते टाक तुमच्या देवघरात असणे आवश्यक आहे?
Answer – कुलदैवत, कुलदेवी, भैरवनाथ (देवांचा रक्षक), ग्रामदैवत, आणि वीर (रक्षक) हे पाच टाक तुमच्या देवघरात असणं आवश्यक आहे.
8) जुने टाक त्याग करणं आणि नवीन टाक प्रस्थापित करणं ह्याचे महत्व?
जुने टाक भंगल्यानंतर ते घरामध्ये ठेवणं अशुभ असते, म्हणून टाक नव्याने करणे गरजेचे असते.